www.navarashtra.com

Published  Nov 06, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

चहा पिण्याआधी 20 मिनिट्स अशा पद्धतीने खा बदाम

सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याने फ्रेश वाटते हे खरं असलं तरीही उपाशीपोटी चहा पिण्याने अनेकदा जळजळदेखील होते

चहा

अनेकदा लोकांना चहा पिण्याने पोटात त्रास होतो अथवा दिवसभर घशात जळजळ होत राहते

गॅस

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजाने सांगितल्याप्रमाणे चहातील कॅफिन हा घटक अ‍ॅसिड वाढवतो आणि त्रासदायक ठरतो

अ‍ॅसिड

.

उपाशीपोटी चहा पिण्याने शरीरातील pH संतुलन खराब होते यामुळे छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होतो

pH संतुलन

.

चहा पिण्याच्या किमान 20 मिनिट्स आधी तुम्ही रात्री भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने फायदा मिळेल

बदाम

बदामात pH अल्कलाईन असून पोटातील अ‍ॅसिड नॉर्मल राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्रास होत नाही

अल्कलाईन

तुम्ही चहा पिण्याआधी बदाम खाल्ल्याने चहा पिऊन झाल्यावर गॅस, अपचनाचा त्रास होत नाही आणि जळजळही होत नाही

का खावे

भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळते ज्यामुळे एनर्जी राहते

भिजवलेले बदाम

याचे सेवन केल्याने लठ्ठपणा, हाय ब्लड शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, जास्त भूक लागण्यासारखे त्रास कमी होतात

फायदे

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप