Published Nov 06, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हळदीचे दूध नक्की कधी प्यावे
हळदीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असून रोज पिण्याने शरीराला फायदे मिळतात, कधी प्यावे?
क्लिनिकल न्यूट्रिशियन आणि डाएटिशियन गरिमा गोएलने हळदीच्या दुधाचे फायदे आणि पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे
तज्ज्ञानुसार, सकाळी वा संध्याकाळी कोणत्याही वेळी हळदीचे दूध पिता येऊ शकते. मात्र रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन योग्य ठरते
.
हळदीचे दूध रात्री पिऊन झोपल्यास थकवा निघून जातो, चिंता नैराश्य दूर होते आणि तुम्हाला रोज चांगली झोप लागते
.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध हा उत्तम पर्याय आहे. नियमित सेवनाने अनेक आजारांपासून दूर राहता
हळदीचे दूध पिण्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅससारखे त्रास कमी होऊन पचनाशी संबंधित त्रास होत नाही
हळदीच्या दुधाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि त्याचे नियमित सेवन केल्याने अति भूक लागत नाही
शरीरावर झालेल्या जखमा त्वरीत भरण्यासाठी तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करावे. यातील अँटीइन्फ्लेमेटरी गुण सूज आणि त्रास कमी करतात
त्वचेवरील मुरूमं, पुरळ, डाग, काळेपणा आणि सूज कमी करण्यासाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते आणि रॅश, एलर्जीपासून वाचवते
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकून देण्यासाठी आणि चांगल्या डिटॉक्सिफिकेशनसाठी हळदीचे दूध पिणे उत्तम ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही