उपवासात केळी, सफरचंद, डाळिंब, पपई, चिकू, द्राक्षे आणि मोसंबी यांसारखी ताजी फळे खावीत. ही शरीराला ऊर्जा देतात.
Picture Credit: Pinterest
दूध, ताक, दही, लस्सी आणि पनीर यांचा आहारात समावेश करू शकता. हे शरीराला प्रथिने आणि कॅल्शियम पुरवतात.
Picture Credit: Pinterest
साबुदाणा, राजगिरा, वरई (भगर), शिंगाडा पीठ आणि राजगिरा पीठ यापासून बनवलेले पदार्थ उपवासासाठी योग्य मानले जातात.
Picture Credit: Pinterest
बदाम, काजू, अक्रोड, मनुका, खजूर तसेच भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया माफक प्रमाणात खाल्ल्यास ऊर्जा टिकून राहते.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे, रताळे, साबुदाणा खिचडी, भगर, राजगिरा थालीपीठ यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत.
Picture Credit: Pinterest
उपवासाच्या दिवशी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय नारळपाणी, लिंबूपाणी किंवा ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
Picture Credit: Pinterest
साबुदाणा वडा, जास्त तेलकट किंवा तूपयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. सात्त्विक आणि संतुलित आहार घेतल्यास उपवास आरोग्यदायी ठरतो.
Picture Credit: Pinterest