Published Nov 29, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
थंडीमध्ये रोज दही खावे की नाही?
थंडीत दही वा नारळ पाणी न खाण्यापिण्याचा सल्ला देण्यात येतो. आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी काही गोष्टींची काळजी घेऊन थंडीत रोज दही खाता येते सांगितले
4-6 तासात जमविण्यात आलेले ताजे आणि गोड दही तुम्ही रोज थंडीच्या दिवसात खाऊ शकता असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे
रात्रभर दही ठेऊन तुम्ही अजिबात खाऊ नये कारण यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. तसंच फ्रिजमधील दहीही खाऊ नये
.
आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, थंडीत दह्याचे सेवन सकाळी वा दुपारच्या जेवणात करावे. इतकंच नाही तर थंडीत दही खावेच
.
कफ असणाऱ्या अथवा कफाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी दही अजिबात थंडीच्या दिवसात न खाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला
दुधी, तोंडली, तोंडलीसारख्या भाज्यांमध्ये दही मिक्स करून थंडीच्या दिवसात खाण्याने शरीराला फायदा मिळतो आणि पचनही चांगले होते
सकाळी 6 वाजता दही लावावे आणि साधारण दुपारी 12-1 च्या दरम्यान हे ताजे दही खावे असा सल्ला डॉ. किरण यांनी दिला आहे
आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही