Published Oct 20, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला मिळतात अनेक फायदे
पोषक तत्वांनी भरपूर असलेले केळे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.
पिकलेल्या केळ्यांप्रमाणेच कच्ची केळीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
.
कच्ची केळी व्हिटामीन बी- 6 आणि व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ही दोन्ही जीवनसत्त्वे केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जातात..
.
कच्ची केळी पोटॅशिअमने भरपूर असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कच्ची केळी आहारातील फायबरचा समृद्ध स्रोत मानली जाते, म्हणून ते दररोज खाल्ल्याने तुमचे पचन सुधारू शकते.
कच्च्या केळ्यामध्ये निरोगी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्याची क्षमता असते, म्हणून ते खाल्ल्याने मूत्रपिंडाचा कर्करोग रोखण्यास मदत होते.