Published Oct 27, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारतामध्ये क्रिकेट सर्वाधिक पसंती दिली जाते, त्याचबरोबर अनेक असे काही खेळाडू आहेत त्यांना लोक भरपूर प्रेम देतात. त्यांच्या नावावर एकदा नजर टाका.
भारताचा स्टार अनुभवी फलंदाज विराट कोहलीचे चाहते जगभरामध्ये आहे, त्याला त्याच्या कामगिरीमुळे चाहते भरभरून प्रेम देतात.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याचे चाहते नेहमीच मैदानात खेळताना पसंत करतात, त्याची गणना दिग्गज क्रिकेटपटूमध्ये केली जाते.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर त्याचा मैदानावरील वावर देखील त्याच्या चाहत्यांचा पसंत आहे.
.
प्रसिद्ध फुटबाॅलपटू आणि आंतरराष्ट्रीय मेगा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची फॅन फॉलोईंग जगभरामध्ये आहे, त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा तो सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्ती आहे.
.
क्रिकेट विश्वातील दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फ़ुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची फॅन फॉलोईंग जगभरामध्ये आहे, त्याच्या कामगिरीमुळे लोक त्याला पसंत करतात.
भारताचा स्टार गोल्डन बॉय नीरज चोप्रा भारताच्या टॉप १० स्पोर्टस्टारच्या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे, त्याला त्याचे चाहते भरपूर प्रेम देतात.
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने विश्वचषकामध्ये केलेल्या कामगिरीनंतर त्याला क्रिकेट प्रेमींकडून भरभरून प्रेम मिळाले आहे.
भारताचा स्टार फ़ुटबॉलपटू सुनील छेत्रीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्यांची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते.
भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पीव्ही सिंधू या यादीमध्ये एकमेव महिला खेळाडू आहे.