बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला.
Picture Credit: BCCI
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली.
ट्रॅव्हिस हेडच्या खेळीने सामन्याचा निकाल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन अर्धशतके झळकावून WTC मध्ये १० मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
WTC मध्ये हेडची कामगिरी उत्कृष्ट राहिली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.
ट्रॅव्हिस हेडच्या पुढे स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा आहेत. ट्रॅव्हिस हेडने ५० सामन्यांमध्ये ३१९९ धावा केल्या आहेत.
ट्रॅव्हिस हेड हा जो रूट, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथनंतर WTC मध्ये सर्वाधिक चौकार मारणारा चौथा फलंदाज ठरला आहे.