Published Oct 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पदार्थ जे करतील फायबरची कमतरता पूर्ण
शरीरामध्ये फायबर कमी असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि अनेकदा आजारी पडू शकता
फायबरची कमतरता असेल तर बद्धकोष्ठता, अपचन, जंत, डिहायड्रेशनसारख्या समस्या निर्माण होतात
फायबरची कमतरता दूर करण्यासाठी डाएटिशियन शिवाली गुप्ता यांनी काही खास पदार्थ सांगितले आहेत
.
गहू, बाजरी, तांदूळ असे संपूर्ण धान्य डाएटमध्ये समाविष्ट करून घेणे फायबरसाठी अत्यंत गरजेचे आहे
.
शरीरातील फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी जांभूळ, पेर, सफरचंद आणि संत्र्यांसारखी फळं खावीत
आपल्या डाएटमध्ये बदाम, चिया सीड्स, आळशी, काजू, पिस्ता यासारख्या सीड्स आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा
फायबरसाठी तुम्ही आहारात ब्रोकोली, कडधान्ये, पालक आणि गाजर यासारख्या पोषक तत्व असणाऱ्या भाज्यांचा समावेश करा
फायबरची कमतरता असेल तर डाएटमध्ये डाळी, राजमा, चणे यासारख्या पदार्थांचा समावेश करावा
फायबर मिळविण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी अंकुरित चणे, मूग खाणे उत्तम. यामुळे शरीर डिटॉक्स राहते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही