रात्री झोप लागत नाही? हे पदार्थ देतील गाढ झोप

Life style

8 January 2026

Author:  नुपूर भगत

दुधात ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम असतं. झोपण्याआधी कोमट दूध घेतल्यास झोप लवकर लागते.

कोमट दूध

Picture Credit: Pinterest

बदामामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. रात्री 4–5 भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते.

 बदाम

Picture Credit: Pinterest

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे शरीरातील ताण कमी करतं. झोपण्याच्या आधी एक केळी खाल्ल्यास चांगली झोप लागते.

केळी

Picture Credit: Pinterest

हे हर्बल चहा तणाव कमी करतात आणि मन शांत करतात. झोपण्याआधी 1 कप घेतल्यास झोपेस मदत होते.

तुळशीचा किंवा कॅमोमाइल चहा

Picture Credit: Pinterest

मध मेंदूला शांत ठेवतो आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतो. कोमट दूध किंवा पाण्यात 1 चमचा मध घालून प्या.

 मध

Picture Credit: Pinterest

रात्री हलका भात, दलिया किंवा ओट्स घेतल्यास सेरोटोनिन हार्मोन वाढतं, ज्यामुळे झोप येण्यास मदत होते.

भात किंवा हलके पदार्थ

Picture Credit: Pinterest

जायफळात नैसर्गिक शांततादायक गुणधर्म असतात. चिमूटभर जायफळ कोमट दुधात घालून घेतल्यास झोप लवकर लागते.

 जायफळ 

Picture Credit: Pinterest