450cc ते Electric! Royal Enfield आणतेय 4 नवीन बाइक्स

Automobile

27 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Royal Enfield चा मोठा प्लॅन!

2027 पर्यंत येऊ शकतात 4 दमदार बाइक्स; 450cc, 750cc आणि इलेक्ट्रिक सेगमेंटवर कंपनीची नजर

Picture Credit: Pinterest

नव्या सेगमेंटमध्ये जोरदार तयारी

350cc बाइक्समधील यशानंतर Royal Enfield आता 450cc, 750cc आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात अनेक नवीन मॉडेल्स सादर होण्याची शक्यता आहे.

Picture Credit: Pinterest

Himalayan 750

Himalayan 750 मध्ये नवीन ट्विन-सिलेंडर इंजिन, अधिक पॉवर आणि लाँग-डिस्टन्स टूरिंगसाठी अनुकूल सेटअप मिळू शकतो. प्रीमियम सस्पेन्शन आणि आधुनिक फीचर्सचीही अपेक्षा आहे.

Picture Credit: Pinterest

Flying Flea S6

Royal Enfield च्या Flying Flea ब्रँडअंतर्गत ही इलेक्ट्रिक बाइक येण्याची शक्यता आहे. शहरातील प्रवासासह हलक्या ऑफ-रोड वापरासाठी ती विकसित केली जात असल्याचे मानले जाते.

Picture Credit: Pinterest

Himalayan 440

Himalayan 411 नंतर किफायतशीर अॅडव्हेंचर बाइक म्हणून Himalayan 440 येऊ शकते. सुमारे 440cc इंजिन, आरामदायी राइडिंग पोझिशन आणि दैनंदिन वापरासोबत टूरिंगवर भर असू शकतो.

Picture Credit: Pinterest

Scram 450

Scram 450 ही Himalayan 450 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. शहरातील वापर आणि वीकेंड अॅडव्हेंचर लक्षात घेऊन 452cc Sherpa इंजिन आणि वेगळे स्टाइलिंग मिळण्याची शक्यता आहे.

Picture Credit: Pinterest

LED हेडलॅम्प, TFT किंवा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्विचेबल ABS, Tripper Navigation, ट्युबलेस टायर्सचा पर्याय

अपेक्षित फीचर्स

Picture Credit: Pinterest

सध्या उपलब्ध माहितीनुसार, या मॉडेल्सपैकी काही बाइक्स 2026 च्या उत्तरार्धापासून ते 2027 दरम्यान टप्प्याटप्प्याने सादर केल्या जाऊ शकतात. कंपनीकडून सर्व मॉडेल्सची अधिकृत लॉन्च तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कधी होऊ शकतात लॉन्च?

Picture Credit: Pinterest