२० रुपयांमध्ये Full Charge, ही स्कूटर विक्रीत नंबर १

Automobile

18 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

EV वाढती मागणी

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर वाढत आहे. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या पाच स्कूटरमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे.

Picture Credit: Pinterest

या स्कूटर्सचा बंपर सेल

Tvs आयक्यूब आणि बजाज चेतक या देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर बनल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

Tvs आयक्यूबला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Tvs आयक्यूब

Picture Credit: Pinterest

Tvs ने एप्रिलमध्ये ३७,१९३ आयक्यूब स्कूटर विकल्या गेल्या. ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ३५% वाढ आहे.

Tvs ने किती स्कूटर विकल्या

Picture Credit: Pinterest

कंपनीने एप्रिल २०२५ मध्ये २७,६०४ आयक्यूब स्कूटर विकल्या. दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये बजाज चेतकच्या ३४,३०४ युनिट्सची विक्री झाली.

उत्तम विक्री

\Picture Credit: Pinterest

Tvs आयक्यूब विविध बॅटरी आणि रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ५९,९९९ पासून सुरु होते.

किती आहे किंमत?

Picture Credit: Pinterest

खरं तर बॅटरी ऍज ए सर्व्हिस अंतर्गत या स्कूटरची किंमत ५९,९९९ पासून सुरु होते. मात्र, iQube ची किंमत ९४,९९९ पासून सुरु होते.

हे लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

Tvs iQube च्या बेस व्हेरिएंटमध्ये २.२kWh क्षमतेची बॅटरी आहे. या व्हेरिएंटची रेंज ९४ किमी असल्यास दावा केला जातो आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी २ तास ४५ मिनिटे लागतात.

२.२kWh क्षमतेची बॅटरी

Picture Credit: Pinterest

टॉप-स्पेक iQube व्हेरिएंटमध्ये ५.३ kWh बॅटरी असून त्याची रेंज २१२ किलोमीटर असल्याचा दावा केला जातो. या व्हेरिएंटची किंमत १.५८ लाख आहे. 

टॉप-स्पेक iQube

Picture Credit: Pinterest

चार्जिंग खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास २.२kWh व्हर्जन घरी चार्ज करण्यासाठी सरासरी २० ते २२ रुपये खर्च येईल. 

चार्जिंगचा खर्च

Picture Credit: Pinterest

Hybrid Carsची पुन्हा चलती!