By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 21 Feb, 2025
भारतात अनेक ऑटो कंपन्या आपल्या EV मार्केटमध्ये लाँच करत आहे. पण या EV चे भारतात भविष्य काय?
इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण यामुळे भारतीय ग्राहक आता EV कडे वळत आहेत.
भारत सरकार काही योजनेअंतर्गत अनुदान आणि करसवलती देत आहे, ज्यामुळे EV खरेदी किफायतशीर होत आहे.
शहरांमध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशन वाढत आहेत, मात्र ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारणा आवश्यक आहे.
भारतीय कंपन्या आता स्वदेशी बॅटरी आणि वाहन उत्पादनावर भर देत आहेत, ज्यामुळे परकीय अवलंबित्व कमी होईल.
लिथियम-आयन बॅटरीपेक्षा अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीच्या संशोधनावर भर दिला जात आहे.
टॅक्सी, बस आणि मालवाहतूक क्षेत्रही आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे.
टाटा, महिंद्रा, ओला यांसारख्या कंपन्या भारतातील EV मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.