www.navarashtra.com

By Nupur Bhagat

सोप्या पद्धतीने घरीच बनवा कुरकुरीत अळूवडी, पारंपरिक रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 15 Feb, 2025

अळूवडी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ आहे. अळूच्या पानांपासून हा पदार्थ तयार केला जातो

पारंपरिक पदार्थ

 अळूची पाने, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, चिंचेचा घोळ, हळद, तिखट, पांढरे तीळ, पाणी, तेल इ.

साहित्य

सर्वप्रथम आळूची पाने धुवून घ्या आणि पानांमधील देठ कापून घ्या

पाने धुवून घ्या

एका भांड्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, तिखट, पांढरे तीळ एकत्र करा

एकत्र करा

आता यात चिंचेचा घोळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि एक घट्टसर मिश्रण तयार करा

मिश्रण 

आता एक पान घ्या आणि यावर हे मिश्रण पसरवून लावा

पान घ्या

पहिल्या पानाच्या बाजूलाच दुसरे पान ठेवून त्याला मिश्रण लावा, पान उलट सुलट करत त्यांना मिश्रण लावा

पानावर मिश्रण लावा

5-6 पानांना मिश्रण लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित गुंडाळा आणि रोल तयार करा

रोल बनवा

हा रोल 20-25 मिनिटे वाफवून घ्या आणि मग थंड करा

वाफ द्या

शेवटी सुरीच्या मदतीने रोलपासून वड्या पाड्या आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा

वाफ द्या