हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित गणपती मंडळ आहे. सुमारे १८ फूट उंच असलेली ही मूर्ती दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते.
मुंबईतील सर्वात जुन्या गणपती मंडळांपैकी एक. येथील पारंपारिक सजावट आणि साधी उत्सव शैली बाप्पाचे खरे रूप समोर आले.
माटुंगा येथील किंग्ज सर्कल येथील गणपती बाप्पाची मूर्ती ६९ किलो सोने आणि ३३६ किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली आहे.
यंदा स्लेटर रोडच्या राजाचं (ग्रँट रोड) देखणं रूप डोळ्याचं पारणं फेडणारं आहे.
कामाठीपुऱ्याचा कृपाळू गणपती देखील प्रसिद्ध आहे. यंदा बाप्पांची शंखधारी मूर्ती अत्यंत आकर्षक आणि देखणी आहे.
अखिल चंदणवाडीचा गोड गणपती प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाची पृथ्वीवर उभ्या स्वरुपात बाप्पांची चतुर्भूज मूर्ती असून एका हातात शंख आहे.
ताडदेव कंपाउंडचा राजा मुंबईत प्रसिद्ध आहे. बाप्पांची मूर्ती चतुर्भूज असून भक्त पाहताक्षणी मंत्रमुग्ध होणार आहेत.