गणेश चतुर्थीचा सण सर्वात खास मानला जातो. हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर तो मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा केला जातो.
ढोल-ताशांचा आवाज, मिठाईचा सुगंध आणि भक्तीमय भजन यामुळे वातावरण आणखी पवित्र होते. मुंबईत हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
पण बाप्पााच्या आगमनच्या वेळेस आपण गणपती बाप्पा मोरया हा जयघोष करतो त्यामागे नेमका काय इतिहास काय आहे?
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते.
मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी आहे. वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी मयुरेश्वर मंदिरात जात राहिले.
परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते.
एके दिवशी श्रीगणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल.
चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती.
ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली.हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते.
गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात.
पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते.