www.navarashtra.com

Published Nov 15,,  2024

By Prajakta Pradhan

गुरु नानकजींच्या या वचनांचे पालन केल्याने बदलते जीवन 

Pic Credit -   iStock

शीख धर्माचे पहिले संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते.

गुरु नानक देव

अनेकदा लोक जीवनात बदल घडवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात, अशा परिस्थितीत गुरुजींचे शब्द महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, त्यांचे पालन केल्याने जीवन बदलते.

जीवनात बदल

जर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर गुरुजींच्या शब्दांचे पालन करा, यामुळे तुमच्या करिअरमध्ये लवकर यश मिळते आणि तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होते.

गुरु नानक यांचे शब्द

गुरू नानक यांनी म्हटले आहे की, एखाद्याने कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने गरीब आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे आणि इतरांचे हक्क हिरावून घेऊ नये.

गरिबांना दान करा

गुरु नानक यांच्यानुसार, महिला आणि पुरुष दोन्हीं बरोबरीचे आहेत. कधीही महिलांचा अपमान करु नये. असे केल्याने तुम्हाला लवकरच यश मिळेल.

महिलांचा अपमान 

आयुष्यात कधीही अहंकार बाळगू नये. अहंकारी लोकांना जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो.

गर्विष्ठ होऊ नका

.

व्यक्तीला नेहमी प्रामाणिकपणे काम करावे. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीची प्रगती होते.

प्रामाणिकपणे काम करा

.

पैसा मिळवण्यासाठी लोकांनी नेहमी मेहनत करावी. अवैधरित्या कमावलेला पैसा जास्त काळ ठेवू नये आणि त्या व्यक्तीला गरिबीचा सामना करावा लागणार नाही

कष्ट करून पैसे कमव

.