आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हा दिवस गुरुंची पूजा करण्याला समर्पित आहे.
यंदा 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यावेळी गुरुची पूजा केल्याने सुख, समृध्दी आणि करियरमध्ये प्रगती होईल.
मान्यतेनुसार गुरूपौर्णिमेला काही उपाय केल्याने सुख, समृध्दी लाभते, जाणून घ्या या उपायांबद्दल
गुरूपौर्णिमेला गुरू यंत्राची स्थापना करा. त्याची दर गुरुवारी पूजा करा. यामुळे कुंडलीमधील गुरू ग्रह मजबूत होईल.
ईशान्य दिशेच्या संबंध गुरू ग्रहाशी मानला जातो. गुरूपौर्णिमेला ईशान्य दिशेला दिवा लावा.
असे मानले जाते की, या दिवशी पिवळे कपडे, मिठाई , केशर, तूप इ. दान केल्याने उत्पन्नात वाढ होते.
गुरूपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा पूजा करा आणि सहस्त्रनामाचा जप करा.
गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूना दक्षिणा म्हणून काही वस्तू देऊ शकता.