www.navarashtra.com

Published  Nov 15, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

गुरुनानक जयंतीनिमित्त जाणून घ्या ‘वाहे गुरू का खालसा वाहे गुरूजी की फतेह’चा अर्थ

शीख धर्मात देवाच्या सन्मानार्थ ‘वाहे गुरू का खालसा वाहे गुरूजी की फतेह’ हे वाक्य म्हटलं जातं. गुरूनानक जयंतीनिमित्त जाणून घेऊया अर्थ

देवाचा सन्मान

अनेक जण या वाक्याचा उच्चार तर करतात पण अनेक धर्मियांना या वाक्याचा अर्थ अजिबात माहीत नाही

माहीत नाही अर्थ

‘वाहे गुरू का खालसा वाहे गुरूजी की फतेह’चा अर्थ आहे ईश्वराची संपदा ईश्वराचाच विजय

काय आहे अर्थ

.

‘वाहे गुरू का खालसा वाहे गुरूजी की फतेह’ म्हणजे सर्व काही ईश्वराचेच आहे आणि शेवटी विजयही ईश्वराचाच होणार आहे

खरा अर्थ

.

वाहे गुरू म्हणजे ग्रंथसाहिबमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे देव. शीख धर्मात देवाला वाहे गुरू असे संबोधण्यात येते

वाहे गुरू

या वाक्याचे शीख धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातून ईश्वराची महानता सांगितली जाते आणि संदेशही दिला जातो

शीख धर्माचे महत्त्व

अरदास, पाठ सुरू होताना वा संपताना ‘वाहे गुरू का खालसा वाहे गुरूजी की फतेह’ चे उच्चारण केले जाते

कधी म्हणावे

सर्वधर्म समभाव मानावा, गुरूनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

टीप