www.navarashtra.com

By Nupur Bhagat

हळदीच्या पानावरील पातोळ्या, कोकणची पारंपरिक रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 27 Jan, 2025

हळदीच्या पानावरील पातोळ्या हा कोकणातील एक फेमस गोड पदार्थ आहे

 गोड पदार्थ

तूप, किसलेलं ओलं खोबरं, किसलेला गूळ, हळदीची पान, तांदळाचे पीठ, पाणी, वेलची पूड, मीठ इ.

साहित्य

यासाठी प्रथम एका पॅनमध्ये तूप घालून यात गूळ वितळवून घ्या

गूळ वितळवा

आता यात वेलीची पूड आणि किसलेले खोबरे घालून सारण बनवून घ्या

सारण

एका भांड्यात तांदळाचे पीठ, मीठ, पाणी घालून उकड काढा आणि पीठ मळून घ्या

तांदळाचे पीठ

हळदीच्या पानावर तेल लावून पिठाचा गोळा यावर थापून घ्या

हळदीचे पान

आता यात तयार सारण घालून हळदीचे पान दुमडून घ्या

पान दुमडा

शेवटी तयार पातोळ्या 20-25 मिनिटे वाफवून घ्या

वाफवा