www.navarashtra.com

By Nupur Bhagat

चटपटीत पाणी पुरीची झटपट रेसिपी नोट करा

Pic Credit -   Pinterest

Published 26 Jan, 2025

पाणीपुरी खायला कुणाला आवडत नाही, यावेळी हा चटकेदार पदार्थ घरी बनवून पहा  आहे

आवडीचा पदार्थ

पुऱ्या, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदिना , चिंचेचा घोळ, काळं मीठ , जिरे पावडर, चाट मसाला, मीठ, पाणी इ.

साहित्य 

उकडलेले बटाटे, कांदा, मीठ, चाट मसाला, लाल तिखट इ.

रगड्यासाठीचे साहित्य

प्रथम मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, चिंचेचा घोळ, हिरव्या मिरच्या आणि पाणी टाकून वाटून घ्या

रेसिपी

आता ही तयार पेस्ट गार पाण्यात टाका आणि यात जिरे पावडर, काळं मीठ, चाट मसाला आणि मीठ एकत्रित घोळवा

पाण्यात मिसळा

उकडलेला बटाटा मॅश करून एका वाडग्यात टाका आणि यात चिरलेला कांदा, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून मिसळा

रगडा

आता शेवटी एक पुरी घेऊन त्याला वरच्या बाजूस एक छिद्र करा

पाणी पुरी

पुरीच्या छिद्रात तयार रगडा आणि पाणी घाला आणि पाणी पुरी खाण्यासाठी सर्व्ह करा 

सर्व्ह करा