www.navarashtra.com

Published Oct 14, 2024

By Narayan Parab 

हरिद्वार-  देवांचे प्रवेश्वदार असणारे पवित्र तीर्थस्थळ  

Pic Credit -  Social Media, iStock

हरिद्वार म्हणजे देवांचे प्रवेशद्वार, हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. येथे भारताच्या धार्मिक संस्कृतीचे दर्शन होते.

हरिद्वार

हरिद्वारमध्ये अनेक ऐतिहासिक  धार्मिक स्थळे आहेत . जाणून घेऊया याविषयी

ऐतिहासिक  धार्मिक स्थळे

हरिद्वारच्या सर्वात प्रसिद्ध घाटांपैकी एक, येथे दररोज सायंकाळी गंगा आरती  केली जाते. येथे भाविक गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करतात.

 हर की पौरी

 हे मंदिर बिल्व पर्वतावर स्थित आहे. भाविक येथे जाण्यासाठी रोपवेचा वापर करु शकतात. 

मनसा देवी मंदिर

 चंडी देवीचे मंदिर हे हरिद्वार येथील नील पर्वतावर स्थित आहे. येथे जाण्यासाठी रोपवे किंवा ट्रेकिंगचा मार्ग आहे.

चंडी देवी मंदिर 

हरिद्वारमध्ये असलेल्या मुख्य शक्तिपीठांपैकी एक असलेले माया देवीचे मंदिर हे प्राचीन असून याचे अनन्यसाधारण महत्व आहे.

माया देवी मंदिर 

गंगेच्या काठावरील सप्तर्षी आश्रमात सप्त ऋषींनी धान्य केले होते अशी मान्यता आहे.  हे एक शांत आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. 

सप्तर्षी आश्रम

हे मंदिर भारत मातेच्या प्रतिमेला समर्पित आहे. मंदिरात देशाच्या विविध राज्यांचे आणि संस्कृतींचे दर्शन होते.

भारत माता मंदिर