Published Nov 07, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रताळ्यांचा आरोग्यासाठी फायदा
रताळे खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. रताळ्यामधील गुण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात
रताळ्यात विटामिन ए, बी, सी, डी, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी गुण असून अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते
पोटॅशियमयुक्त असल्याने रताळे हृदयासाठी उत्तम ठरते. तसंच रताळ्याच्या सेवनाने ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते
.
फायबरचे प्रमाण रताळ्यात अधिक असल्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या टळते आणि पचनक्रिया चांगली राहते
.
विटामिन ए आणि बी कॅरोटिन असलेले रताळे सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली टिकून राहते
लोहाच्या कमतरतेने शरीरातील उर्जा निघून जाते अशावेळी रताळे उपयुक्त ठरते. तसंच महिलांना मासिक पाळीसाठीही उपयोगी होते
रताळ्यात लो कॅलरी आणि सुपरफूड असून हे खाल्ल्यावर लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही