Published Nov 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केसांसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे
तांदळाचे पाणी हे आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. केसांच्या अनेक समस्या यापासून सुटू शकतात
तांदूळ पाणी हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर असून केसांवर याचा कसा वापर करावा याबाबत अधिक माहिती
तांदळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि लोह असे अनेक पोषक तत्व आढळतात, जो केसांना मजबूती देतात
.
तांदूळ पाण्यात धुवून घ्या आणि नंतर 30 मिनिट्स चांगल्या पाण्यात भिजवा. मधून मधून चमच्याने ढवळा
.
साधारण 24 तास हे तांदळाचे पाणी तसंच ठेवा आणि संपूर्ण एक दिवस हे पाणी तसंच राहू द्या
तांदळाचे हे पाणी केस धुतल्यानंतर केसांना लावा आणि काही वेळ तसंच ठेवा आणि कंडिशनरप्रमाणे वापरून केस धुवा
तांदळाचे पाणी तुम्ही हेअरमास्कप्रमाणेही वापरू शकता. यात एलोवेरा जेल, इसेन्शियल ऑईल मिक्स करून केसांना लावा
तांदळाचे पाणी तुमच्या केसांना अधिक मऊ मुलायम करते आणि त्याशिवाय केसांना नैसर्गिक चमक मिळवून देते
याप्रमाणेच तांदळाच्या पाण्यामुळे दुहेरी केसांची समस्या सुटण्यास मदत मिळते
केसातील कोंडा आणि वयापेक्षा अधिक लवकर केस सफेद झाले असल्यास नैसर्गिकरित्या हा त्रास कमी करते
तांदळाच्या पाण्यामुळे स्काल्पमधील कोंडा निघून जाऊन फंगल इन्फेक्शनचा धोकाही टळतो
आपल्या ब्युटिशियननुसार तांदळाच्या पाण्याचा वापर करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही