भिजवलेले हिरवे मूग स्वच्छ धुऊन घ्या. त्यामध्ये हिरवी मिरची आणि आले घालून थोडे पाणी वापरत गुळगुळीत वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात रवा, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला.
Picture Credit: Pinterest
सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून 10 ते 15 मिनिटे मिश्रण झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
अप्पेपात्र गरम करून प्रत्येक साच्यात थोडे तेल लावा.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक साच्यात तयार मिश्रण ओता आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
अप्पे एका बाजूने सोनेरी झाल्यावर पलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम हिरव्या मूगाचे अप्पे प्लेटमध्ये काढा आणि नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest