www.navarashtra.com

Published  Oct 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

नाश्त्यासाठी उत्तम पर्याय, पालक ऑम्लेट रेसिपी

सकाळी झटपट नाश्त्यासाठी तुम्ही पालक आणि अंडी मिक्स करून हेल्दी पर्याय तयार करू शकता

नाश्ता

अंडी आणि पालक हे दोन्ही हेल्दी पदार्थ एकत्र करून तुम्ही नाश्त्याला अंडा पालक ऑम्लेट बनवा

अंडा पालक ऑम्लेट

3 अंडी, कापलेला कांदा, आलं-लसूण  ठेचून, अर्धा कप कापलेला पालक, हिरवी मिरची तुकडे, हळद, लाल मिरची, तेल वा बटर, मीठ

साहित्य

.

सर्वात पहिले एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात कांदा आणि हिरवी मिरची, आलं-लसूण टाकून मिक्स करा

स्टेप 1

.

भाजल्यावर त्यात पालक मिक्स करून उकडून घ्या, मग त्यात हळद, लाल मिरची पावडर मिक्स करा

स्टेप 2

मसाले टाकल्यावर व्यवस्थित शिजवा आणि दुसऱ्या बाजूला एका भांड्यात अंडे फोडून फेटून घ्या

स्टेप 3

एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि त्यावर फेटलेले अंडे घालून ऑम्लेट तयार करा आणि वरील मिश्रण घाला आणि 2-3 मिनिट्स पलटून घ्या

स्टेप 4

पालक ऑम्लेट तयार असून नाश्त्यामध्ये ब्रेडसह वा सॉससह गरमागरम खा. हे हेल्दी आणि टेस्टी असते

स्टेप 5

सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवले असेल तर ही डिश तयार व्हायला केवळ 10 मिनिट्स लागतात

टीप

पालक, केलसारख्या भाज्यांमधील विटामिन ए, सी आणि के कोलेजन उत्पादन वाढवून त्वचा चांगली राखण्यास फायदा मिळवून देते

चटणी