देशात इथेनॉल आणि फ्लेक्स फ्यूएलसारख्या पर्यायी इंधनांवर चर्चा सुरु आहे. सरकारने पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण वाढवण्यासाठी एक अधिसूचना जारी केली.
Picture Credit: Pinterest
येत्या काळात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण आणखी वाढणार आहे. दरम्यान, फ्लेक्स फ्यूएलवर बरीच चर्चा सुरु आहे.
Picture Credit: Pinterest
खरं तर, हीरो मोटोकॉर्प आपली पहिली फ्लेक्स-फ्यूल बाईक देखील लाँच करत आहे. या बाईकचे अनावरण ३ जून रोजी केले जाईल.
Picture Credit: Pinterest
ही केवळ कंपनीसाठीच नव्हे तर देशाच्या वाहन क्षेत्रासाठीही एक मोठी संधी असेल.
Picture Credit: Pinterest
फ्लेक्स-फ्यूएल वाहने सामान्य पेट्रोल तसेच उच्च इथेनॉल मिश्रित इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
Picture Credit: Pinterest
E85 सारखे इंधन वापरले जाऊ शकते, ज्यामध्ये ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल असते.
\Picture Credit: Pinterest
हीरो मोटोकॉर्पने २०२५ इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपल्या फ्लेक्स-फ्यूएल बाईकचा प्रोटोटाईप प्रदर्शित केला होता.
Picture Credit: Pinterest
मात्र, तज्ज्ञांच्या मते हीरो स्प्लेंडर या तंत्रज्ञानासाठी एक प्रबळ दावेदार ठरु शकते.
Picture Credit: Pinterest
स्प्लेंडर ही अनेक वर्षांपासून देशातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल आहे.
Picture Credit: Pinterest
लाँच होणारी बाईक ही प्रोडक्शन मॉडेल असेल, कॉन्सेप्ट मॉडेल नाही. तिची किंमत आणि फीचर्स लाँच कार्यक्रमा दरम्यान किंवा त्यानंतर जाहीर केली जाऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
फ्लेक्स-फ्यूएल तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की वाहन मालकांना इंधनामध्ये असलेल्या इथेनॉलच्या प्रमाणाबद्दल चिंता करावी लागणार नाही.
Picture Credit: Pinterest
जर सरकारने भविष्यात जास्त इथेनॉल मिश्रण अनिवार्य केले, तर त्याचा फ्लेक्स फ्युएल वाहनांवर कोणताही परिणाम होणार नाही.
Picture Credit: Pinterest
अलीकडे E20 पेट्रोलबद्दल अशा तक्रारी समोर आल्या आहेत की, E20 इंधनामुळे जुन्या वाहनांचे मायलेज कमी झाले आहे आणि वाहनांचे भाग निकामी झाले आहेत.
Picture Credit: Pinterest