Published Nov 29, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
धनाचा वर्षाव होण्यासाठी करा कार्तिक अमावस्येला 5 उपाय
हिंदू धर्मात कार्तिक मावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दरम्यान केलेले पूजापाठ, दानधर्म हे अत्यंत शुभ असते
पंचांगानुसार, 01 डिसेंबर रोजी कार्तिक अमावस्या आहे. या दिवशी काही उपाय केल्याने तुमची भरभराट होते
कार्तिक अमावस्येची सुरूवात 30 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजून 39 मिनिट्सने सुरू होणार आहे आणि 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिट्ने संपेल
.
कार्तिक अमावस्येला गंगा नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दरम्यान सूर्याला पाणी अर्पित करून जीवनात सकारात्मकता मिळते
.
कावळा, कुत्रा, मुंग्यांना कार्तिक अमावस्येला खाणे खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कोणतीही कमतरता भासत नाही
गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि धनाचे दान केल्यानेही फायदा मिळतो. न होणारी कार्ये यामुळे होऊ शकतात आणि सुख-समृद्धी मिळते
कार्तिक अमावस्येला पूजा करताना ॐ श्री कृष्णाय नमः अथवा ॐ श्री दामोदराय नमः मंत्राचा जप करावा, तुमच्या इच्छा पूर्ण होतील
कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण करणे शुभ मानण्यात येते यामुळे पितृ दोष दूर होतो आणि बाधा दूर होते
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही