केमिकलशिवाय जाड भुवया मिळवण्याचे सोपे उपाय

Life style

4 January 2026

Author:  नुपूर भगत

एरंडेल तेलात पोषक घटक असतात. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्याने किंवा स्वच्छ ब्रशने भुवयांवर लावा आणि सकाळी धुवा.

एरंडेल तेल

Picture Credit: Pinterest

कांद्याच्या रसात सल्फर असतं, जे केसांची वाढ वाढवते. थोडासा रस भुवयांवर लावा, 10–15 मिनिटांनी धुवा.

कांद्याचा रस

Picture Credit: Pinterest

कोरफड जेल केसांची वाढ जलद करतो. ताजा जेल भुवयांवर लावून हलका मसाज करा, धुण्याची गरज नाही.

कोरफड जेल

Picture Credit: Pinterest

बदाम तेलात व्हिटॅमिन E असतं, जे केस जाड होण्यास मदत करतं. आठवड्यातून 3–4 वेळा वापर करा.

बदाम तेल

Picture Credit: Pinterest

कापसाने दूध किंवा साय भुवयांवर लावा. 15 मिनिटांनी धुवा. यामुळे भुवया मजबूत होतात.

दूध किंवा दुधाची साय

Picture Credit: Pinterest

खोबरेल तेल केसांना पोषण देऊन मुळं मजबूत करतं. दररोज रात्री हलक्या हाताने भुवयांवर मसाज करा.

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

स्वच्छ मस्कारा ब्रश किंवा टूथब्रशने रोज भुवया वरच्या दिशेने ब्रश करा. रक्ताभिसरण वाढून केसांची वाढ सुधारते.

नियमित ब्रशिंग

Picture Credit: Pinterest