अंडा रोलची सोपी रेसिपी 

Life style

3 January 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, चिमूटभर मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्या.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

अंडी फोडून त्यात मीठ, मिरी पावडर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून फेटा.

अंड्यांचे मिश्रण

Picture Credit: Pinterest

तव्यावर थोडे तेल गरम करून मैद्याच्या पिठाची पातळ पोळी शेकून घ्या.

पोळी शेकणे

Picture Credit: Pinterest

पोळीच्या एका बाजूला अंड्याचे मिश्रण ओतून हलके पसरवा.

अंडं घालणे

Picture Credit: Pinterest

पोळी उलटवून अंडं नीट शिजेपर्यंत छान शेकून घ्या.

शिजवणे

Picture Credit: Pinterest

त्यावर कांदा, कोबी, चाट मसाला आणि सॉस घालून घट्ट रोल करा.

रोल तयार करणे

Picture Credit: Pinterest

गरमागरम एग रोल टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest