www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

गॅसची समस्या होईल छुमंतर, वापरून पहा घरगुती उपाय

पोटात गॅस तयार होणं ही अत्यंत सामान्य समस्या आहे पण यामुळे पोटात कळा येणं, दुखणं या समस्या होतात

गॅस समस्या

गॅसची समस्या कमी करण्यासाठी किचनमधील काही पदार्थांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

घरगुती उपाय

दिल्लीतील आयुर्वेदिक डॉक्टर आर. पी. पराशर यांनी बडिशेप खाल्ल्याने गॅसची लक्षणे कमी करता येतात असे सांगितले

बडिशेप

.

ओव्यामध्ये सैंधव मीठ मिक्स करून चाऊन खाल्ल्यास गॅसची समस्या नियंत्रित होते. तुम्ही ओवा पाण्यात उकळून काळे मीठ घालून पिऊ शकता

ओवा

.

गॅसची समस्या कमी करण्यासाठी तुळशीची पानेही फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुळशीची पाने धुऊन उकळा आणि सेवन करा

तुळस

ताकात चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असून गॅसपासून त्वरीत सुटका मिळवून देते. तुम्ही डाएटमध्ये ताकाचा समावेश करावा

ताक

गुळाचा पचनासाठी उपयोग होतो. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास जेवण पचण्यास मदत मिळते आणि गॅसची समस्या होत नाही

गूळ

आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप