Published Nov 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Uric Acid पासून मिळवा त्वरीत सुटका, या बियांचा करा उपयोग
ओवा प्रत्येकाच्या किचनमध्ये सहज उपलब्ध आहे. खाण्यात स्वाद वाढविण्यासह आरोग्यासाठीही ओवा खूपच फायदेशीर ठरतो
आयुर्वेदात ओव्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. डॉक्टर माधव भागवत यांनी ओवा कोणत्या समस्यांपासून दूर ठेवतो सांगितले आहे
ओव्यात विटामिन ई, बी, सी आणि ई सह मिनरल्स अर्थात कॅल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, मॅग्नेशियम आणि लोह आढळते
.
ओवा तुम्ही भाजून अथवा कच्चा चाऊनदेखील खाऊ शकता, यामुळे गॅस, अपचनसारख्या पोटाच्या समस्येतून सुटका मिळते
.
एखाद्याला दारूचे व्यसन असल्यास त्याने ओव्याचे पाणी उकळून त्याचा अर्क रोज जेवणाच्या आधी प्यावा, यामुळे व्यसनमुक्ती होते
ओव्याचे सेवन पचनासह लिव्हरच्या आजारासाठीही उपयुक्त ठरते. तसंच प्राणायाम आणि योगासन करूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो
ओव्यात युरिक अॅसिड कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून सूज कमी करण्यास मदत मिळते
ओवा हा मूत्रवर्धक असून याच्या सेवनाने मूत्रप्रवाह वाढतो आणि शरीरातील युरिक अॅसिड बाहेर काढण्यास लाभ होतो
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी अर्धा चमचा ओवा पावडर 1 ग्लास पाण्यात मिक्स करा आणि दिवसातून 2-3 वेळा सेवन करावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही