कंपनीने नुकतीच होंडा सिटी लाँच केली. आता कंपनी ३ जबरदस्त नवीन कार घेऊन येत आहे.
Picture Credit: Pinterest
यामध्ये हायब्रीड SUV, एलिव्हेट आणि कंपनीच्या पहिल्या भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही होंडाची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
होंडाची नवीन ZR-V हायब्रीड SUV जपानमधून पूर्णपणे तयार (CBU) युनिट म्हणून भारतात दाखल होईल. तिची डिलिव्हरी जुलै २०२६ पासून सुरु होईल.
Picture Credit: Pinterest
यामध्ये १८ इंची अलॉय व्हील्स, फुल LED हेडलाइट्स, LED टेललाइट्स, कॉर्नरिंग लाइट्स, पॉवर्ड फ्रंट सीट्स, ड्रायव्हर सीट मेमरी फंक्शन, पॅनोरॅमिक सनरुफ यांसारखे फीचर्स असतील.
Picture Credit: Pinterest
ही SUV केवळ ७.९ सेकंदात ० ते १०० किमी/ तास वेग गाठू शकते. ती २२.८ किमी/लीटरचे मायलेज देईल.
\Picture Credit: Pinterest
SUV एलिव्हेटची फेसलिफ्टेड वर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. जी अनेक वेळा टेस्टिंग करताना दिसली आहे.
Picture Credit: Pinterest
यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नवीन होंडा सिटीसारखी फ्रंट डिझाइन असण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
पहिल्यांदाच एलिव्हेटमध्ये हायब्रीड इंजिनचा पर्यायही देऊ शकणार आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनी २०२७ च्या सुरुवातीला भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार, अल्फा O लाँच करेल अशी अपेक्षा आहे.
Picture Credit: Pinterest
जपान मोबिलिटी शोमध्ये सादर करण्यात आले असून याचे उत्पादन भारतात केले जाईल. ही कंपनीची पहिली मेड इन इंडिया ईव्ही असेल.
Picture Credit: Pinterest
कंपनी ही EV केवळ भारतीय बाजारपेठेतच विकणार नाही. तर भारतात तयार झालेली ही इलेक्ट्रिक कार जपानलाही निर्यात केली जाईल.
Picture Credit: Pinterest