Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
वृंदावन सोसायटी ही ठाण्यातील एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित निवासी सोसायटी आहे, जी 1980 च्या दशकात उभारली गेली.
इथल्या 66B इमारतीत एका मध्यमवयीन पुरुषाने आत्महत्या केली, त्यानंतर असामान्य आणि अकल्पित घटनांची मालिका सुरू झाली.
रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, कोणीतरी अचानक येऊन त्यांना चापट मारतो – परंतु आजूबाजूला कोणीही नसते.
काही रहिवाशांनी घरात अज्ञात हालचाली जाणवल्याचं आणि कोणीतरी पाहत असल्याचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे.
या इमारतीतील काही फ्लॅट्स अजूनही रिकामे आहेत कारण काही लोक त्यात राहायला घाबरतात.
कोणत्याही भौतिक नुकसानाच्या घटना घडल्या नाहीत, मात्र या घटनांमुळे मानसिक अस्वस्थता आणि भीतीचा वातवरण तयार झाले.
काहीजण या गोष्टींना अफवा समजतात, तर अनेकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचा दावा केला आहे.
वृंदावन सोसायटी आता ठाण्यातील "हॉन्टेड प्लेसेस" यादीत समाविष्ट असून, याबद्दल ब्लॉग्स, युट्यूब व्हिडिओ आणि वेबसाइट्सवर चर्चा होते.