Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
सध्या आंब्याचा सीजन सुरू आहे. हापूस ही आंब्याची सर्वोत्कृष्ट जात मानली जाते
मात्र या हापूस नावामागचा रंजक इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
हापूसला अल्फोन्सो अस म्हणतात आणि याच नाव ठेवण्यामागे पोर्तुगीजांचा मोठा वाटा आहे
पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते ज्यांनी आंब्यावर अनेक प्रयोग केले
त्यांनी आंब्याची नवी जात विकसित केली, जिला अल्फोन्सो म्हटले जाऊ लागले
स्थानिक लोक किंवा ग्रामीण भागात याला अपूस म्हणू लागले
महाराष्ट्रात पोहचेपर्यंत याचा तोंडी उच्चार हापूस असा झाला