Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत डीहायड्रेशनची समस्या जाणवते
अशात आहारात विविध पेयांचा समावेश करणे फायद्याचे ठरते
या ऋतूत बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात येतो. आंब्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि याची चव सर्वांनाच फार आवडते
उन्हाळ्याच्या कडक वातावरणात तुम्ही आहारात मँगो कोकोनट ड्रिंकचा समावेश करू शकता
पिकलेला गोड आंबा – १ कप, नारळाचे दूध – १ कप, दही – ½ कप, मध किंवा गूळ – १-२ चमचे, बर्फाचे तुकडे – ४-५, एक चिमूटभर वेलची पावडर, नारळाचे तुकडे किंवा पुदिना इ.
यासाठी सर्वप्रथम आंबा धुवून, सोलून त्याचे तुकडे करा
आंबा, नारळाचे दूध, दही आणि मध घाला, बर्फाचे तुकडे आणि वेलची पावडर घाला आणि पेस्ट करा
स्मूदी छान क्रिमी आणि गुळगुळीत होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्या
आता यात नारळाचे तुकडे किंवा पुदिन्याच्या पाने टाका आणि पिण्यासाठी सर्व्ह करा