Published Oct 27, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
राजकीय पक्षांना चिन्ह कसे मिळते ? तुम्हाला माहिती आहे का?
पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी अर्ज करणे आवश्यक असते, ज्यामध्ये पक्षाचे संविधान, ध्येय-उद्दिष्टे आदी माहिती दिली जाते.
राजकीय पक्षाने आयोगाने ठरवलेल्या निकषांवर राष्ट्रीय अथवा प्रादेशिक मान्यता मिळवणे आवश्यक असते.
राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांसाठी वेगवेगळे निकष असतात. त्यामध्ये मतदानांची टक्केवारी आणि सदस्यसंख्या यांचा समावेश असतो.
आयोगाच्या उपलब्ध चिन्हांमधून पक्षाकडून चिन्ह निवड करता येते.
यानंतर राष्ट्रीय/प्रादेशिक पक्षांना स्वतंत्र चिन्ह देण्यात येते. जे राष्ट्रीय पक्ष देशभर आणि प्रादेशिक पक्ष राज्यात वापरु शकतात.
चिन्ह मिळाल्यानंतर आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
.
काही प्रादेशिक पक्षांना तात्पुरत्या स्वरुपातही चिन्ह दिले जाते, अनेकदा ते चिन्ह कायम ठेवण्यात येऊ शकते.
.
काही वेळा आयोगाकडून चिन्हामध्ये आवश्यक तो बदल केला जातो.