प्रेमात आहात? हे 7 रेड फ्लॅग्स अजिबात दुर्लक्ष करू नका

Life style

12 february 2026

Author:  नुपूर भगत

जर तुमचा पार्टनर तुमच्या कपड्यांपासून मित्रांपर्यंत सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा मोठा इशारा आहे. 

सतत कंट्रोल करणे

Picture Credit: Pinterest

थोडीशी जळफळाट सामान्य आहे, पण प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे हे असुरक्षिततेचे लक्षण आहे. हे पुढे जाऊन तणाव निर्माण करू शकते.

खूप जास्त जळफळाट

Picture Credit: Pinterest

तुमच्या भावना, मत किंवा स्वप्नांचा  आदर न करणारा पार्टनर दीर्घकाळासाठी योग्य नसतो. आदराशिवाय कोणतेही नाते  टिकत नाही.

आदराचा अभाव

Picture Credit: Pinterest

लहानसहान गोष्टींमध्येही खोटं बोलणं हा विश्वासघाताचा संकेत असतो. विश्वास तुटला तर नातं कमजोर होतं.

वारंवार खोटं बोलणे

Picture Credit: Pinterest

“तू माझ्यासाठी हे नाही केलंस तर…” अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे भावनिक दबाव टाकणे. हे हेल्दी रिलेशनशिपचं लक्षण नाही.

 भावनिक ब्लॅकमेल

Picture Credit: Pinterest

लहान कारणावरून ओरडणे, वस्तू फेकणे किंवा आक्रमक वागणे हे धोकादायक संकेत आहेत. अशा वागण्याकडे दुर्लक्ष करू नये.

रागावर नियंत्रण नसणे

Picture Credit: Pinterest

जर नात्यात तुम्हाला स्वतःसारखं राहता येत नसेल आणि सतत बदलण्याचा दबाव असेल, तर हा रेड फ्लॅग आहे. 

तुमची ओळख हरवणे

Picture Credit: Pinterest