www.navarashtra.com

Published  Nov 09, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

नोकरीमुळे मेंटल हेल्थवर होतोय परिणाम, कसे ओळखावे

आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी केली जाते पण नोकरीचा आनंद कधी त्रासात बदलतो हे कोणालाच कळत नाही

नोकरी

नोकरी करताना अनेक जणांना मानसिक त्रास, ताण आणि मानसिक आजारांना सामोरं जावं लागत असल्याचं अभ्यासात समोर आलंय

ताण

नोकरीमुळे तुम्हाला मानसिक त्रास होतो आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही लक्षणं माहीत असण्याची गरज आहे

लक्षणं

.

नोकरीच्या विचाराने आणि त्रासामुळे जेव्हा तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुम्ही मानसिक तणावाखाली आहात हे ओळखून जा

झोप

.

नोकरीच्या ताणामुळे व्यक्ती अधिक चिडचिडा होतो ज्यामुळे आपल्या कामावर, व्यक्तीगत जीवनावरही माणूस लक्ष केंद्रीत करू शकत नाही

चिडचिड

सततचा नोकरीचा ताणतणाव आणि काम यामुळे माणसाला सकाळी झोपेतून उठल्यानंतरही थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हलदेखील कमी होते

थकवा

नोकरीत मानसिक त्रास असणारा व्यक्ती अचानक शांत राहू लागतो आणि हळूहळू त्याचे सोशल सर्कलही कमी होऊ लागते

शांत राहणे

आपल्याला मानसिक त्रास होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप