Published Oct 27, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media,
आचार्य चाणक्य हे महान पंडित होते.
चाणक्यंनी जीवनाविषयक सांगितलेली मुलमंत्र आजच्या काळातंही तंतोतंत लागू पडतात.
मित्र कसे असावेत आणि कोणाशी मैत्री करु नये याबाबत चाणक्यंनी मूलमंत्र दिले आहेत.
मानवी आयुष्यातील सगळ्यात जवळचं नातं मैत्रीचं असतं.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुका दाखवत नाही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणं घातक आहे.
चाणक्य सांगतात की, जी माणसं तोंडावर गोड बोलतात आणि पाठ फिरली की नावं ठेवतात अशा माणसांपासून चार हात लांब रहावं.
जी माणसं तुमच्या समस्या समजून घेतात आणि तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्यासाठी वेळ प्रसंगी रागवतात असे मित्र आयुष्यभर जपावेत.
विश्वास आणि खरेपणा मैत्रीचा पाया आहे, त्यामुळे विश्वास घातकी लोकांना वेळीच ओळखा,असं चाणक्य सांगतात.