Published Oct 04, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
उपवासात कशी मिळेल एनर्जी
उपवास अथवा व्रतदरम्यान शरीरात थकवा आणि कमकुवतपणा येतो. अशावेळी एनर्जी कशी सांभाळायची जाणून घ्या
एसेंट्रिक डाएट्स क्लिनिक, दिल्लीच्या डाएटिशियन शिवाली गुप्ता यांनी शरीरातील एनर्जी वाढवणारे काही पदार्थ सांगितलेत
उपवासादरम्यान एनर्जीसाठी तुम्ही मखाणे खावेत. यातील अँटीऑक्सिडंट्स गुण इम्युनिटी वाढविण्यास मदत करतात
.
नारळ वा शहाळ्याचे पाणी पिण्याने शरीरातील उर्जा टिकून राहते. यातील इलेक्ट्रोलाईट्स शरीराची एनर्जी पातळी वाढवतात
.
खाबुदाणा खिचडी, वडे, थालिपीठ इत्यादी उपवासासाठी योग्य ठरते. कार्बोहायड्रेटसचा हा उत्तम सोर्स असून शरीराला एनर्जी देते
कॅल्शियम आणि लोहयुक्त शिंगाड्याच्या पिठाचा तुम्ही उपयोग करावा. शरीरात अधिक काळ यामुळे उर्जा टिकून राहते
एनर्जी बुस्टिंगसाठी नैसर्गिक साखर असणारी फळं अधिक उपयुक्त ठरतात. पोट भरलेले राहते आणि थकवाही दूर होतो
सायकलिंग, वॉकिंग, स्विमिंग, जॉगिंगसारखा हलकाफुलका व्यायाम करावा दिवसभर उर्जा राहते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही