सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुमचा स्मार्टफोन तुम्ही पूर्ण बंद करा जेणेकरून स्वच्छतेदरम्यान कोणतेही डॅमेज होणार नाही
Picture Credit: iStock
कोणत्याही मुलायम आणि स्वच्छ ब्रशने स्पीकरवरील धुळीची जाळी साफ करून धूळ काढून टाका
टूथपिकने हळुवारपणे किनाऱ्यावर जमलेली घाण काढा. लक्षात ठेवा हे करताना जोर लाऊ नका
छोटा हँड ब्लोअर अथवा बल्ब ब्लोअर वापरून हवा मारा जेणेकरून धूळ आतून बाहेर फेकली जाईल
ट्रान्सपरंट टेप स्पीकरवर चिकटवून खालून खेचा, यामुळे जाळीत अडकलेली धूळ टेपसह बाहेर येईल
सुक्या कॉटन स्वॅबने स्पीकर पोर्ट साफ करा. ओल्या कापसाने सर्किट खराब होईल त्यामुळे सुकाच वापरा
स्वच्छ केल्यानंतर गाणं वा व्हिडिओ लाऊन स्पीकरचा आवाज तपासा आणि स्वच्छ झाला की नाही पहा
फोन केस वा कव्हर असे घ्या ज्यामुळे स्पीकरवर धूळ जमणार नाही आणि त्याचे संरक्षण होईल. हवं तर डस्ट प्रोटेक्शन जाळी लावा
स्क्रीन आणि स्पीकरच्या आजूबाजूला मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छता करा, ज्यामुळे स्क्रॅच येणार नाही