Published Nov 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Uric Acid दुप्पट वेगाने वाढवतात हे पदार्थ, वेळीच आहारातून काढा बाहेर
प्रत्येकाच्या शरीरात युरिक अॅसिड तयार होते आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र काही पदार्थांमुळे युरिक अॅसिड वाढल्यास त्रास होतो
किडनी शरीरातून युरिक अॅसिड बाहेर काढण्याचे काम करते. मात्र युरिक अॅसिडचा स्तर वाढल्यास किडनीसाठीही हे त्रासदायक ठरते
युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, ऑस्टिओपोरायसिस अशा आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी काही पदार्थ खाऊ नयेत
.
रेड मीट, व्हाईट मीट, मासे यामध्ये प्युरिनचे प्रमाण अधिक असून शरीरातील युरिक अॅसिड वाढविण्याचे काम करते, योग्य प्रमाणात खावे
.
जास्त साखरयुक्त पदार्थ वा पॅकेज्ड फ्रूट ज्युस इत्यादी पदार्थांचे सेवनदेखील करणे तुम्ही टाळावे, अन्यथा युरिक अॅसिडचा त्रास होऊ शकतो
रिफाईंड कार्ब्स, मैदा, व्हाईट ब्रेड, कुकीज आणि पेस्ट्रीसारखे पदार्थ खाणे वर्ज्य करावे कारण हे पदार्थ शरीरात युरिक अॅसिड वाढवतात
पालक, फ्लॉवर, वांग, अळकुडी वा अरवी, मशरूमसारख्या भाज्यांमध्ये प्युरीन जास्त प्रमाणात असून यामुळे शरीरात युरिक अॅसिड वाढते, जास्त प्रमाणात याचे सेवन करू नये
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही