भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून गणरायाची मनोभावे पूजा केली जाते.
Picture Credit: Pixabay
पण तुम्ही गणरायाची जी मूर्ती पूजताय ती पीओपी आहे की मातीची?
मातीची मूर्ती वजनाने फार जड असते. तर, शाडूची मूर्ती वजनाने हलकी असते.
मातीची मूर्ती घडवताना लाकडी पाटाचा वापर. बाप्पाची मूर्ती लाकडी पाटावर असेल तर ती मातीची मूर्ती समजावी.
मूर्तीची चमक एकदा पाहून घ्या. पीओपी मूर्ती अधिक चमकदार असते. तर, मातीच्या मूर्तीला फार चमक नसते.
पीओपीच्या मूर्ती साचातून तयार केल्या जातात. त्यामुळे या मूर्ती एकसलग असतात.
मातीच्या मूर्तीतील अवयव दूरदूर असल्याचे दिसतात. तर, मूर्तीवर उंदीरही चिकटलेला नसतो.
मातीची मूर्ती वाळायला वेळ लागतो. तर, पीओपीची मूर्ती तुलनेने कमी वेळ घेते.
मातीची मूर्ती योग्यपद्धतीने सुकावी याकरता मागे एक छिद्र दिलेले असते. छिद्रामुळे मातीच्या मूर्तीला भेगाही पडत नाहीत.
पीओपी मूर्तीला असे छिद्र नसते. त्यामुळे मूर्तीच्या मागील छिद्र पाहून तुम्ही मूर्ती मातीची आहे की पीओपीची हे ओळखू शकाल.