Published Nov 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
या काळ्या ड्रायफ्रूटचे गुणधर्म आहेत कमाल, बद्धकोष्ठता होईल छुमंतर
खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाचा त्रास अनेकांना होताना दिसतोय. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढतेय
या सगळ्या त्रासामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेच्या समस्या जास्त होत असून यातून कशी सुटका मिळेल जाणून घ्या
तज्ज्ञांच्या मते तुम्ही काळ्या मनुकांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून त्वरीत सुटका मिळू शकते. याचे सेवन कसे करावे जाणून घ्या
.
या काळ्या मनुकांमध्ये नैसर्गिक साखर, फायबर, विटामिन आणि मिनरल अधिक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
.
बद्धकोष्ठता असल्यास रोज तुम्ही रात्री 5-6 मनुकांचे सेवन करणे योग्य ठरते. लवकरात लवकर ही समस्या कमी होते
रोज सकाळी तुम्ही मनुका पाण्यात भिजवा आणि रात्री झोपण्यापूर्वी हा भिजलेल्या मनुका न चुकता खा आणि सकाळी परिणाम पहा
तुम्ही या मनुकाचे पाणीदेखील पिऊ शकता. रोज रात्री भिजलेल्या मनुका खाल्ल्याने सकाळी तुमचे पोट साफ होईल आणि आराम मिळेल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही