Published Nov 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मुलांची हाडं आहेत कमकुवत, 5 लक्षणे
आपण जर डॉक्टरांशी चर्चा केली तर आजकाल मुलांमध्ये विटामिन D ची सर्वाधिक कमतरता असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येते
मात्र मुलांमध्ये विटामिन डी ची कमतरता नक्की कशी ओळखायची याची लक्षणेच पालकांना बरेचदा कळत नाहीत
यासाठी सेलिब्रिटी फिजिओथेरपिस्ट डॉ. एजाज अशाई यांनी मुलांमधील विटामिन डी च्या कमतरतेची लक्षणे सांगितली आहेत
.
चालताना वा धावताना अगदी जरासे पडल्यावरही जास्त प्रमाणात लागणे आणि घाव होणे हे सर्वात पहिले लक्षण आहे
.
मुलांचे पोश्चर जर खराब असेल अर्थात मुलं वाकून चालत असतील, पाय सरळ नसतील अथवा हाडात वाकडेपणा दिसत असल्यास विटामिन डी कमी आहे
वयाप्रमाणे मुलांच्या वाढीचा विकास होत नसेल अथवा बाकीच्या मुलांच्या तुलनेत उंचीने लहान असतील तर नक्कीच विटामिन डी ची कमतरता आहे
खेळताना वा धावताना मुलांच्या पायात वा हाडांमध्ये दुखणे आणि त्यांना लगेच दमायला होणे
कोणत्याही प्रकारचा खेळ खेळताना अथवा फिजिकल अॅक्टिव्हिटी करताना मुलांना खूपच त्रास होत असेल तर पालकांनी समजून जावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही