सणासाठी खास बूंदी लाडूची सोपी रेसिपी

Life style

20 September 2026

Author:  नुपूर भगत

बेसन चाळून घ्या. त्यात थोडे-थोडे पाणी घालून गुठळी नसलेले, मध्यम पातळसर पीठ तयार करा. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ ठेवू नका.

बेसनाचे पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. बूंदीच्या झाऱ्यावर पीठ घेऊन हलक्या हाताने टॅप करत गरम तेलात बूंदी पाडा. 

बूंदी पाडा

Picture Credit: Pinterest

कढईत साखर आणि पाणी घालून गरम करा. साखर विरघळल्यानंतर पाकाला उकळी आणा आणि साधारण एकतारी पाक तयार करा.

 साखरेचा पाक बनवा

Picture Credit: Pinterest

तयार बूंदी पाकात घालून व्यवस्थित मिसळा. त्यात वेलची पूड, केशर आणि तूप घाला.

बूंदी पाकात मिसळा

Picture Credit: Pinterest

काजू, बदाम आणि मनुका थोडे तुपात परतून घ्या. हे मिश्रण बूंदीमध्ये घालून सर्व साहित्य एकजीव करा.

ड्रायफ्रूट घाला

Picture Credit: Pinterest

बूंदीचे मिश्रण पूर्ण थंड होण्यापूर्वी मिश्रण हाताला सहन होईल इतके गरम असताना लाडू वळल्यास ते सहज आकार घेतात.

मिश्रण थंड होऊ द्या

Picture Credit: Pinterest

हाताला थोडे तूप लावून बूंदीचे मिश्रण घेऊन घट्ट दाब देत गोल लाडू वळा. तयार बूंदी लाडू काही वेळ ताटात ठेवून सेट होऊ द्या.

लाडू वळा

Picture Credit: Pinterest