गूळ-चणा डाळीपासून तयार करा खमंग चिक्की

Life style

19 August 2026

Author:  नुपूर भगत

 भाजलेली चणा डाळ स्वच्छ करून बाजूला ठेवा. डाळ जास्त भाजलेली असल्यास चिक्कीला कडवट चव येऊ शकते.

चणा डाळ तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत गूळ आणि एक चमचा पाणी घालून मंद आचेवर गूळ वितळू द्या.

गूळ वितळवा

Picture Credit: Pinterest

गूळ पूर्ण वितळल्यानंतर सतत ढवळत राहा. पाकाचा एक थेंब थंड पाण्यात टाकल्यावर तो लगेच कडक झाला, की पाक तयार आहे.

पाक तयार करा

Picture Credit: Pinterest

 तयार पाकात साजूक तूप आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.

तूप आणि वेलची घाला

Picture Credit: Pinterest

आता भाजलेली चणा डाळ पाकात घालून प्रत्येक डाळीला पाक व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने पटकन मिसळा.

चणा डाळ मिसळा

Picture Credit: Pinterest

तुपाचा हलका हात लावलेल्या ताटात मिश्रण काढा. वरून तुपाचा हात लावून किंवा लाटण्याच्या मदतीने पातळसर लाटून घ्या.

लाटून घ्या

Picture Credit: Pinterest

 मिश्रण गरम असतानाच सुरीने चौकोनी किंवा आयताकृती तुकडे पाडा. पूर्ण थंड झाल्यावर चिक्कीचे तुकडे वेगळे करून हवाबंद डब्यात साठवा.

चिक्की कापा

Picture Credit: Pinterest