बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट; अशी करा पनीर कुरकुरे

Life style

14 August 2026

Author:  नुपूर भगत

पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून एका भांड्यात घ्या.

पनीरचे तुकडे 

Picture Credit: Pinterest

 त्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडे मीठ व पाणी घाला. पातळसर पण घट्टपणा असलेले बॅटर तयार करा.

कॉर्नफ्लोअर स्लरी 

Picture Credit: Pinterest

एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम्ब्स घ्या. पनीरचा प्रत्येक तुकडा आधी तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवून घ्या.

ब्रेडक्रम्ब्स घ्या

Picture Credit: Pinterest

बॅटरमध्ये बुडवलेला पनीरचा तुकडा लगेच ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. ब्रेडक्रम्ब्स पनीरला व्यवस्थित चिकटतील याची काळजी घ्या.

पनीर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ठेवा. तेल पुरेसे गरम झाल्यावर पनीरचे तुकडे त्यात सोडा.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

 पनीरचे तुकडे सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर ते टिश्यू पेपरवर काढा.

पनीरचे तुकडे तळा 

Picture Credit: Pinterest

तयार कुरकुरीत पनीर कुरकुरे गरमागरम टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा तुमच्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest