मक्याचे कटलेट कसे बनवायचे?

Life style

30 July 2026

Author:  नुपूर भगत

उकडलेल्या मक्याचे दाणे मिक्सरमध्ये हलकेच फिरवून जाडसर वाटून घ्या. पूर्ण पेस्ट करू नका.

मक्याची पेस्ट

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात वाटलेला मका, कुस्करलेले बटाटे, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड, मीठ घालून एकजीव करा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

मिश्रण खूप ओलसर वाटत असल्यास त्यात कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेडक्रम्ब्स घालून घट्ट करा.

कॉर्नफ्लोअर घाला

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून त्यांना गोल किंवा अंडाकृती कटलेटचा आकार द्या.

कटलेटचा आकार द्या

Picture Credit: Pinterest

प्रत्येक कटलेट ब्रेडक्रम्ब्समध्ये हलकेच घोळवून सर्व बाजूंनी समान कोटिंग करा.

ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा 

Picture Credit: Pinterest

तवा गरम करून त्यावर थोडे तेल घाला. कटलेट मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

शॅलो फ्राय करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम मक्याचे कटलेट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा दही-पुदिना डिपसोबत सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest