बाहेरून कुरकुरीत, आतून रसाळ चिकन फ्रायची सोपी रेसिपी

Life style

29 July 2026

Author:  नुपूर भगत

चिकन स्वच्छ धुवून त्यात दही, अंड, मीठ, लाल तिखट, काळी मिरी आणि लसूण पेस्ट घालून किमान ४ तास किंवा रात्रभर मॅरिनेट होऊ द्या.

चिकन मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

एका मोठ्या भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, ओनियन पावडर, मिक्स हर्ब्स, पॅप्रिका आणि थोडे मीठ एकत्र करून चांगले मिसळा.

कोटिंगचे मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेले चिकन प्रथम मैद्याच्या मिश्रणात घोळवा. त्यानंतर पाण्यात घोळवा आणि् मग पुन्हा मैद्याच्या पिठात घोळवा.

डबल कोटिंग करा

Picture Credit: Pinterest

एका खोल कढईत पुरेसे तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल योग्य तापमानाला आल्यावरच चिकन तळायला सुरुवात करा.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

एकावेळी काहीच तुकडे तेलात सोडा. मध्यम आचेवर १२–१५ मिनिटे किंवा चिकन पूर्णपणे शिजून सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

चिकन तळा

Picture Credit: Pinterest

तळलेले चिकन वायर रॅक किंवा टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल आणि चिकन अधिक खुसखुशीत राहील.

 अतिरिक्त तेल काढा

Picture Credit: Pinterest

गरमागरम चिकन फ्राय मेयोनेझ, स्पायसी डिप किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest